मराठीतले तथाकथित टकारान्‍त शब्द : कॉट, खाट, घाट, पाट, पोट, भेट, मोट,  लाट, वाट, कपाट,  चिरूट, चिलट, तरट, तर्कट, ललाट, कटकट, खटपट, पोळपाट,  फरफट व सारीपाट यांची अनेकवचने अनुक्रमे कॉटा, खाटा, घाट, पाट, पोटे, भेटी. मोटा, लाटा, वाटा, कपाटे, चिरूट, चिलटे, तरटे, तर्कटे, ललाटे, कटकटी, खटपटी, पोळपाट, फरफटी आणि सारीपाट  अशी होतात. त्यामुळे कॉमेंटचे अनेकवचन कॉमेंटी झाले तर आश्चर्य नाही.