'त्या दृष्टीने आंदोलने महत्त्वाची आहेत'  म्हणजे सरकार बदलण्याच्या दृष्टीने का? आंदोलनामागे सरकार बदलण्याचा हेतू होता का? 'हिडन अजेंडा' म्हणतात तो हाच का?

भ्रष्टाचार भारतीय नागरिकांच्या नसानसांत मुरलेला आहे. कोणतेही सरकार आले तरी ते अशा भ्रष्ट नागरिकांनीच निवडून दिलेले असेल आणि आपल्या मायबाप भ्रष्ट मतदात्यांचा मान आणि त्यांच्या भ्रष्ट इच्छा-आकांक्षा सरकारला राखाव्याच लागतील. भारतीय माणसाला लागलेली ही अनाचाराची कीड आजची नव्हे, स्वातंत्र्यानंतरची नव्हे. गेली शेकडो वर्षे ही अधोगती, नागरिकांमधली बेपर्वाई कायम आहे. किंबहुना त्यामुळेच इसवी सनाचे दुसरे सहस्रक बहुतांशी अंधकारमय राहिले आहे.आगरकरांनी आधी सामाजिक सुधारणा आणि मग राजकीय सुधारणा असा आग्रह धरला होता कारण नागरिक म्हणून जर आम्ही अक्षम ठरलो तर राजकीय सुधारणा राबविण्यासही आम्ही सक्षम ठरणार नाही.चर्चिलनेही  हेच भाकित केले होते की हे अडाणी इंडियन्स देश काय चालवणार? देशात अराजक आणि अंदाधुंदी माजेल.आज आपण ते खरे होताना पाहात आहोत.