प्रत्येकलेखाला प्रतिसाद दिला जात नाही पण मी तुमच्या लेखाची नियमीत वाचक आहे. अध्यात्म म्हणजे काहीतरी अगम्य अशी माझी कल्पना. तुमच्या साध्या सोप्या आणि विशेष म्हणजे स्वानुभवातून लिहिलेले लेख माझ्यासारख्या अडाणीला अध्यात्म समजून घेण्यास मदत करतात. नामस्मरण व विवाहा ह्याबद्दल  शंभर टक्के सहमत. सध्या मुलीसाठी वरसंशोधन प्रकियेतून जात आहे.  रोज एक वेगळा अनुभव घेतेय. आज एवढं नामस्मरण झालंच पाहिजे म्हणून ते केव्हाही कुठेही करताना साधक मंडळी बघितली आहे.  एक साधक ठराविक घरी किंवा व्यक्तीच्या हातच खातो. आम्ही सहलीला गेलो असताना टपरीवरचे पोहे-तर्री मस्त हाणली. हे सगळ बघता मी जरा ह्याक्षेत्रापासून अलिप्त असते पण तुमचे लेख अत्यंत प्रामाणिक वाटतात.