'स्वामित्व आग्रही' असा शब्द समुहच वापरावा लागेल असे वाटते. (अमुक तमुक च्या बाबतीत स्वामित्वाची भावना बाळगून असणे)

आई आपल्या मुलाच्या बाबतीत स्वामित्व आग्रही आहे हे वाक्य कसे वाटते?

मुल आपल्या खेळण्यांच्या बाबतीत स्वामित्व आग्रही आहे हे जरा तरी बरे वाटते...

याला संक्षिप्त रुप देउन 'स्वाग्रही' (स्वार्थी नव्हे) चालेल?

आपण शब्द तयार करायला काय हरकत आहे? माझ्या परिचयाच्या एका गृहस्थांनि विंबल्डन संबंधी 'ग्रास कोर्ट' ला 'तृणान्गण' असे नाव ठेवले तोपर्यंत त्याला मराठीत प्रतिशब्द नव्ह्ताच!