शॉर्टकट मारणे ही वाईट सवय. केवळ 'इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द' असा विचार करून आपली भावना कशी काय व्यक्त होवू शकेल? मग अखेरीस म्हटले जाईलच कि इंग्रजीच वापरूया!
इंग्रजीमधून जसा विचार केला जातो, तसा विचार मराठीत करून तो आधी समजून घ्यावा लागेल, मग त्या नव्या संकल्पनांमधून वेगळे शब्द उत्पन्न होतील.
दिलेल्या उदाहरणांमध्ये 'पझेसिव' हा शब्द एक 'डिगरी' (आता ह्या इंग्रजी 'डिगरीला' मराठीत प्रतिशब्द काय? कारण इथेच वैचारीकतेचे स्तर उलगडतात.) व्यक्त करीत आहे. हि डिगरी कशाची आहे? तर अनुक्रमे - आपुलकीची, आसक्तीची, मालकीची. तुम्हाला डिगरीला प्रतिशब्द हवाय नां?, पण मग विचारताना मात्र तुम्ही म्हणताय, मला वरील तीन शब्दांसाठी प्रतिशब्द हवेत.
'कंबरेत वाकत, विहीरीतून हाताने रशी ओढत पाणी काढणे.' ही वैचारीकतेची प्राथमिक अवस्था.
'विहीरीतून 'रहाटेच्या' मदतीने रशी ओढत पाणी काढणे.' ही वैचारीकतेची प्रगत अवस्था.
मराठी ही इंग्रजीपेक्शा वैचारीकतेच्या खालच्या अवस्थेत आहे. आधी त्या अवस्थेतून आपल्याला प्रगतावस्थेत जायला हवे. मग नव-नवे शब्द आपसुखच सुचतील.