यू मीन व्हॉट यू से !! तुमचे लेख वाचताना हे सतत जाणावत.
मला आध्यात्मीक अनुभव अगैरे काही नाहि. पण वेगवेगळ्या साधनामार्गांचे थोडेफार आचन केलय. साधारणतः ध्यानमार्गीयांचे नामस्मरणाबद्दल हेच मत असतं कि मनाची एकाग्रता साधण्याचं ते एक साधन आहे बस्स. पण भक्तीमार्गीय सिद्धांची नामस्मरणामागची कारणमिमांसा अगदी भिन्न आहे. ते नामस्मरणाला एकाग्रतेचं साधन मानत नाहित. जे निराकार निव्वळ निराकार आहे आणि ज्या निराकाराला साकाराचा भास होतोय, त्यांच्या प्रेम संबंधाला पुनरज्जीवीत करण्याचं साधन म्हणजे नामस्मरण होय. या नामस्मरणाचे फळ मनाची शुण्यातली एकाग्रता नाही तर या एकाग्रतेतून साधणारा निखळ प्रेमानंद आहे. ज्याचं नामस्मरण करायचय ते साधन नसून साध्य आहे. आणि हा निखळ, शाश्वत, अविनाशी प्रेमानंद भोगत राहणे ही साधनेची सर्वात परिपक्व अवस्था आहे.
तुमची निराकाराची थेअरी एकदम सोपी, लॉजीकल आणि कन्वींसींग आहे. या विषयावर इतकं छान लिखाण मी क्वचीतच वाचलं असेल. पण ते अपूर्ण वाटतं. स्वतःचं निराकारत्व जाणवल्यावर तुम्ही ज्याला अथांग रहस्यमयी अवस्था म्हणता भक्तीमार्गीय त्यालाच शाश्वत प्रेमानंद म्हणत असतील काय??