साळसूद, क्या बात है!
मला असं विवेचन अपेक्षित आहे
पण निराकाराला झालेला साकारचा भ्रम नव्या आकाराच्या कल्पनेनी दूर होणार नाही, कारण भक्तीमार्गातला देव (किंवा मुळात देव) ही व्यक्तीगत कल्पना आहे म्हणून तर त्यात वैविध्य आहे, पण आपलं स्वरूप किंवा निराकार एक आहे किंवा बुद्धाच्या अफलातून कथना प्रमाणे ते शून्य आहे, तो नथींगनेस आहे.
निराकाराला झालेला आपण आकार आहोत हा भास, नवा आभास (देव) कसा दूर करेल?
कोणताही भक्तीमार्गी देव निराकार आहे असं मानत नाही (इस्लाम सोडून), पण इस्लाम 'निराकाराला समर्पण' असा साधा मुद्दा मांडतो ते कुणाच्या लक्षात येतंय? मला मूड आला तर मी इस्लामवर नक्की लिहिन, सूफीझम माझा आवडता विषय आहे.
>ज्याचं नामस्मरण करायचय ते साधन नसून साध्य आहे.
= जर साध्य आपणच असू तर नामस्मरणाचा प्रयास कशाला? असं माझं म्हणणंय.
> आणि हा निखळ, शाश्वत, अविनाशी प्रेमानंद भोगत राहणे ही साधनेची सर्वात परिपक्व अवस्था आहे.
= नामस्मरणात लक्ष स्वतःकडे वळण्या ऐवजी नामाकडे जातं ही उघड गोष्ट आहे त्यामुळे जो आनंद वाटतो तो काही काळ मनाच्या अनिर्बंध प्रवाहातून थोडी मोकळीक मिळाल्याचा असतो. अविनाशी आनंद म्हणजे आपण निराकार आहोत हा उलगडा आणि निराकाराशी झालेली अभंग संलग्नता यातून येतो.
>स्वतःचं निराकारत्व जाणवल्यावर तुम्ही ज्याला अथांग रहस्यमयी अवस्था म्हणता
= नाही मी निराकारत्व जाणल्यावर फार काही भारी किंवा रहस्यमय होतं असं मानत नाही कारण ती असण्याची सहज अवस्था आहे.
माझ्या मते 'बाय डिफॉल्ट' ती अवस्था हेच आपलं स्वरूप आहे.
माझ्या अनुभवानी हा आनंद म्हणजे एक लाईट मूड आहे (आपण सहज गुणगुणायला लागतो तसा) आणि वेळ किंवा प्रसंग काहीही असो तुम्ही त्या मूडमध्ये राहू शकता इतकं अध्यात्म सोपं आहे
संजय