>>निराकाराला झालेला आपण आकार आहोत हा भास, नवा आभास (देव) कसा दूर करेल?
--हा भास कुठलाही देव, धर्म, साधनामार्ग... कुणिही दूर करू शकतो का संजयजी? इट्स मॅटर ऑफ कॉमनसेन्स. मी कर्म "करतो" -> मला हे स्वातंत्र्य आहे-> हे स्वातंत्र्य काळातीत ओब्जेक्टलाच असू शकते -> मी काळातीत आहे -> काळ आणि स्पेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून मी "आकारातीत" आहे. इट शुड बी सो सिंपल.
भक्ती मार्गात देव किंव्हा भक्त महत्त्वाचे नाहित, तर भक्तीभाव महत्त्वाचा आहे. हा भाव "मी आकार नाही" या "नकार थेअरीचा" आणि "मी अखंड आनंदस्वरूप आहे" या "होकार थेअरीचा" अफलातून संयोग आहे. भक्तीभाव ही वीज आहे. जर तुम्ही वीज अनुभवली तर तिच्या दोन टोकाला + आणि - पोल्स असतीलच असतील. तद्वत, जर भक्ती अनुभवली तर तिच्या दोन टोकाला भक्त आणि भगवान आलेच आले. मला निराकाराच्या थेअरीत आणि भक्तीमार्गात कुठेच काँट्रॅडीक्शन दिसत नाही.
>>जर साध्य आपणच असू तर नामस्मरणाचा प्रयास कशाला? असं माझं म्हणणंय
--आपण कोण आहोत याचा विसर पडलाय ना.... तोच तर प्रोब्लेम झालाय. तहान लागलीय तर विहीर खणावीच लागेल. पण याचा अर्थ पाणी निर्माण करणे नाही. फक्त माती-दगड दूर करायचे. एकदा तो आनंद झरा लागला कि मग आनंदाचे डोही आनंद तरंग :)
>>कोणताही भक्तीमार्गी देव निराकार आहे असं मानत नाही
--कुठलाही भक्तीमार्ग देव "सच्चीदानंद" आहे असं सांगतो. या एका शब्दावर भक्तीमार्गाचा डोलारा उभा आहे. सच्चीदानंदाची व्याख्या मी तुम्हाला समजून सांगावी - लहान तोंडी मी एव्हढा मोठा घास घेउ शकत नाही देवा.
>>नामस्मरणात लक्ष स्वतःकडे वळण्या ऐवजी नामाकडे जातं ही उघड गोष्ट आहे त्यामुळे जो आनंद वाटतो तो काही काळ मनाच्या अनिर्बंध प्रवाहातून थोडी मोकळीक मिळाल्याचा असतो. अविनाशी आनंद म्हणजे आपण निराकार आहोत हा उलगडा आणि निराकाराशी झालेली अभंग संलग्नता यातून येतो
-- नामस्मरण म्हणजे सच्चीदानंदाच्या सागरात बुडी मारणे. ज्याची जेव्हढी कॅपॅसीटी तो तेव्हढा वेळ डुंबू शकेल. देहभाव पूर्णपणे विरघळून जायला लागायचा तेव्हढा वेळ लागेलच. अविनाशी आनंद, निराकाराची "कीक" बसायची तेव्हाच बसेल. तुम्हाला स्वतःला एका क्षणात ते जमलं असेल, आमच्या सारख्यांना नाही जमलय ना अजून...
>>माझ्या अनुभवानी हा आनंद म्हणजे एक लाईट मूड आहे (आपण सहज गुणगुणायला लागतो तसा) आणि वेळ किंवा प्रसंग काहीही असो तुम्ही त्या मूडमध्ये राहू शकता इतकं अध्यात्म सोपं आहे
-- हे इतकं सोपं आहे - अगदी कॉमनसेन्स सारखं :)