ह्या सगळ्या चर्चेवरून माझ्या सहकाऱ्यात नि माझ्यातला मोबाईलवरच्या (चलध्वनीवरच्या)संवादातील एक वाक्य आठवले. ते आहे तसे खाली देतोय:
सहकारीः जोशी सर, कंटाळा आलाय, एखादी, कंटाळा घालवू शकणारी साईट सुचवा की!! (वेबसाईट हा शब्द त्यांनी वापरलेला नाही!! )
त्यांनी मग असे म्हणावयास हवे होते का?
जोशी सर, कंटाळा आलाय, एखादं, कंटाळा घालवू शकणारं स्थळ सुचवा की!!
मराठीत स्थळ ह्या शब्दाचा अर्थ मी मनोगतींना वेगळा सांगायची गरज नाही.
अर्थात मी मराठी प्रतिशब्द सुचविण्याच्या विरोधात वगैरे काही नाही.
फक्त 'असे' आणि पर्यायाने 'हसे' होणे टाळले पाहिजे, प्रतिशब्द योजताना, एवढंच.
कृष्णकुमार द. जोशी