श्री प्रशात मनोहर यांच्याशी सहमत. तसेच लेखकाशीही सहमत. गंमत म्हणजे, सगळं सोपं करण्याच्या हव्यासापोटी आणि विनाकारण आलेल्या 
हिंदिकरणामुळे भाषा समृद्ध तर होत नाहीच पण नवीन शिकणाऱ्यांचा जो बोजवारा उडतो, तो पाहण्यासारखा असतो. किती तरी उसने  शब्द 
खटकतात. उदा. सुरक्षितता ऐवजी सुरक्षिता, सादर करीत आहोत ऐवजी सादर आहे. ,मी आले, मी गेले च्या ऐवजी ,  मी आली , मी गेली ,
म्हणजे , मै आयी , मै गयी   या रचनांचं भाषांतर आहे. हल्ली काहिही लिहा, कसही लिहा , अर्थ निघाला नाही तरी हरकत नाही, तसच भावना 
पोचतायत ना ? मग कशाला हरकत घेता ? असं ऐकू येतं. एकदा तर मी काही चुका दाखवून दिल्या तर, ऐकणारा म्हणतो (मराठी असूनही )
"अंकल , चलता है, चलता है. " हिंदीशी आमचं वैर नाही, पण आमच्या भाषेची टिंगल टवाळी होत असेल , तर ऐकून कसं घेणार ? काही शब्द 
दुसऱ्या भाषेतून जसेच्या तसे आले तरी हरकत नाही , पण त्यांचं मराठीकरण जर हास्यास्पद होत असेल तर काय उपयोग ? त्यापेक्षा सरकारी 
कार्यालयातील पदनाम कोश वापरावा , हे बरे.