अटक-मटक-चवळी चटक खेळ खेळल्या सारखे नवे शब्द विचारणे व सुचवणे हा पोरखेळ नाही कां?
शब्द आपसुख 'सुचणं' हि वेगळी गोष्ट आहे. मारून मुटकून घडवून तो 'सुचवणे' ही वेगळी गोष्ट आहे. या संकेतस्थळावर आत्तापर्यंत अनेक शब्द 'घडवून सुचवले' गेलेले आहेत. त्यापैकी किती शब्द महाराष्ट्रातील मराठी जनांनी नसतील, पण या संकेतस्थळावरल्याच मंडळींनी स्विकारले, वापरलेले आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत शब्द सुचवले आहेत, त्यांना तरी आठवते कां कि त्यांनी कोण-कोणते शब्द सुचवले आहेत?, व ते स्वतः देखिल त्या शब्दांचा वापर करीत आहेत?
शब्द घडवायचेच असतील तर त्याचीच 'एक वैचारीक बैठक' अगोदर नको कां बसवायला? जे संस्कृत थोडंफार जाणतात, तेच अधिकारवाणीने शब्द सुचवतात (जुन्या घाटणीने). मराठी भाषेची ह्या विशयाबाबत कोणती मांडणी आहे? नाही आहे नां? हि मांडणी व तिची घडवण्याची पद्धतच मराठी भाषेची अवस्था सुधारू शकते.