>निराकाराला झालेला आपण आकार आहोत हा भास, नवा आभास (देव) कसा दूर करेल?

--हा भास कुठलाही देव, धर्म, साधनामार्ग... कुणिही दूर करू शकतो का संजयजी? इटस मॅटर ऑफ कॉमनसेन्स.

= साळसूद, सर्व भासमान असू शकेल पण फक्त एकच गोष्ट निर्विवाद आहे ती म्हणजे आपण! ज्याला भास होतोयं तो स्वत: भासमान असू शकत नाही त्यामुळे नुसतं असणं आणि जाणणं या गोष्टी (स्व:स्मरण) कोणताही भास दूर करू शकेल.

> मी कर्म "करतो" -> मला हे स्वातंत्र्य आहे-> हे स्वातंत्र्य काळातीत ओब्जेक्टलाच असू शकते -> मी काळातीत आहे -> काळ आणि स्पेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून मी "आकारातीत" आहे. इट शुड बी सो सिंपल.

= तुम्ही असा विचार करून पाहा, स्पेस मध्ये टाइम आहे किंवा वेळेचा भास व्हायला कुणी तरी हवं, हा स्व एकदा गवसला की मग कर्माचा ‘विकल्प आहे’. माझ्या अनुभवानी कर्मयोग म्हणजे कर्मातली स्वछंदता. यू मे वर्क, यू मे नॉट वर्क अँड व्हेन यू वर्क यू हॅव मल्टिपल ऑपशन्स बिकॉज द वर्क इज कॅरीड ओन्ली ऍट द बॉडी अँड माइंड लेवल, यू रिमेन अनाफेक्टेड!

>भक्ती मार्गात देव किंव्हा भक्त महत्त्वाचे नाहित, तर भक्तीभाव महत्त्वाचा आहे. हा भाव "मी आकार नाही" या "नकार थेअरीचा" आणि "मी अखंड आनंदस्वरूप आहे" या "होकार थेअरीचा" अफलातून संयोग आहे. भक्तीभाव ही वीज आहे. जर तुम्ही वीज अनुभवली तर तिच्या दोन टोकाला + आणि - पोल्स असतीलच असतील. तद्वत, जर भक्ती अनुभवली तर तिच्या दोन टोकाला भक्त आणि भगवान आलेच आले. मला निराकाराच्या थेअरीत आणि भक्तीमार्गात कुठेच काँट्रॅडीक्शन दिसत नाही.


इथे मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे, मी अखंड आनंदस्वरूप आहे किंवा मी निराकार आहे या दोन्ही पूर्ण आणि शून्य या अभिव्यक्तीच्या दोन छटा आहेत पण ‘मला तो भेटेल’ किंवा मला त्याचं दर्शन होईल ही आशा वृथा आहे

>जर साध्य आपणच असू तर नामस्मरणाचा प्रयास कशाला? असं माझं म्हणणंय

--आपण कोण आहोत याचा विसर पडलाय ना.... तोच तर प्रोब्लेम झालाय. तहान लागलीय तर विहीर खणावीच लागेल. पण याचा अर्थ पाणी निर्माण करणे नाही. फक्त माती-दगड दूर करायचे. एकदा तो आनंद झरा लागला कि मग आनंदाचे डोही आनंद तरंग
= येस, आय ऍग्री. माझं म्हणणं फक्त प्रयासाबद्दल आहे, जर आपण सत्य आहोत ही वस्तुस्थिती आहे तर मग तिच्याशी संलग्न व्हायला प्रयास लागत नाही, फक्त बोध काम करेल एवढच माझं म्हणणं आहे.

>कोणताही भक्तीमार्गी देव निराकार आहे असं मानत नाही

--कुठलाही भक्तीमार्ग देव "सच्चीदानंद" आहे असं सांगतो. या एका शब्दावर भक्तीमार्गाचा डोलारा उभा आहे. सच्चीदानंदाची व्याख्या मी तुम्हाला समजून सांगावी - लहान तोंडी मी एव्हढा मोठा घास घेउ शकत नाही देवा.

= नाही हो, लहान-मोठं असं काही नाही, आपण सर्वच जर सत्य आहोत आणि मी ते फक्त मांडतोय, एखाद्याला ते समजलं नाही तर त्यामुळे त्याच्या स्वरूपात काहीही फरक पडत नाही... समजलं तर मजा येते एवढच!

>नामस्मरणात लक्ष स्वतःकडे वळण्या ऐवजी नामाकडे जातं ही उघड गोष्ट आहे त्यामुळे जो आनंद वाटतो तो काही काळ मनाच्या अनिर्बंध प्रवाहातून थोडी मोकळीक मिळाल्याचा असतो. अविनाशी आनंद म्हणजे आपण निराकार आहोत हा उलगडा आणि निराकाराशी झालेली अभंग संलग्नता यातून येतो

-- नामस्मरण म्हणजे सच्चीदानंदाच्या सागरात बुडी मारणे. ज्याची जेव्हढी कॅपॅसीटी तो तेव्हढा वेळ डुंबू शकेल. देहभाव पूर्णपणे विरघळून जायला लागायचा तेव्हढा वेळ लागेलच. अविनाशी आनंद, निराकाराची "कीक" बसायची तेव्हाच बसेल. तुम्हाला स्वतःला एका क्षणात ते जमलं असेल, आमच्या सारख्यांना नाही जमलय ना अजून...

= आपणच सागर आहोत तर वेगळी बुडी मारायचा किंवा न जमायचा प्रश्न नाही इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतोयं.
आपल्याला सत्य व्हायचं नाहीये, रोजच्या जगण्यात वापरायचंय.

>माझ्या अनुभवानी हा आनंद म्हणजे एक लाईट मूड आहे (आपण सहज गुणगुणायला लागतो तसा) आणि वेळ किंवा प्रसंग काहीही असो तुम्ही त्या मूडमध्ये राहू शकता इतकं अध्यात्म सोपं आहे

-- हे इतकं सोपं आहे - अगदी कॉमनसेन्स सारखं

= तुम्ही याला सहमत असाल तर मला आनंद आहे!

संजय