>>यू मे वर्क, यू मे नॉट वर्क अँड व्हेन यू वर्क यू हॅव मल्टिपल ऑपशन्स बिकॉज द वर्क इज कॅरीड ओन्ली ऍट द बॉडी अँड माइंड लेवल, यू रिमेन अनाफेक्टेड!
-- एक्झॅक्टली. किंबहुना "असणे" हेच एकमेव कर्म आहे, नाही का...

>>पण ‘मला तो भेटेल’ किंवा मला त्याचं दर्शन होईल ही आशा वृथा आहे
-- ज्ञानेशरांनी या "दर्शनाचं" फार सुरेख वर्णन केलय. हे चर्मचक्षूंनी होणारं सामान्य दर्शन नाहि तर अनुभवसिद्ध आत्मभान आहे. इथे बघण्याची क्रिया शोधाने सुरू होते आणि व्ह्युवर-ओब्जेक्ट अंडर हिसिबीलीटी-साईट इट सेल्फ या तिघांच्या एकिकरणाने संपते. "सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापकू मुरारी" हेच ते दर्शन. आणि हे दर्शन होईल ही केवळ आशा नाही तर विवेकाने आलेला कॉंफिडन्स आहे.

>>बोध काम करेल एवढच माझं म्हणणं आहे.
हो. पण माणसाचा मुर्खपणा म्हणा, कि कस्तुरीमृगासारखी स्थिती म्हणा... आपल्याच नाभितला सुगंध शोधत जन्मभर भटकत राहावं लागतय.

>>आपणच सागर आहोत तर वेगळी बुडी मारायचा किंवा न जमायचा प्रश्न नाही इतकंच मी सांगायचा प्रयत्न करतोयं.
आपल्याला सत्य व्हायचं नाहीये, रोजच्या जगण्यात वापरायचंय.
-- येस्स. तुम्ही ज्या सोप्या शब्दात हे सगळं समजून सांगितलय, उसका जवाब नहि. नामस्मरणातील मानसीक एकाग्रतेवर तुम्ही जे विचार मांडलेत तेही पटले. मला फक्त त्याचा एडिशनल(कि मूळ??) एंगल सांगायचा होता...