साळसूद यांनी नामस्मरणाबद्दल फार चांगले सांगीतले. मला चार पुस्तके वाचून जे समजले ते असेच काहिसे आहे. मनाला बोध झाला तर ठिक. नुसते वाचून बोध होईल असे नाही. मनावर संस्कार होईल. तो संस्कार अजून व्यापक करायला, आणि द्रृढ करायला अभ्यास करावाच लागेल. तुम्ही सुद्धा अनेक पुस्तके वाचली, विचार केला. हीच साधना आहे. तीचे स्वरूप प्रत्येक व्यक्तीसाठी भिन्न असेल. 
आत्मसाक्षात्कार हा एका क्षणात होतो आणि टिकतो हे म्हणणे गुरुदेव रानडे यांनासुद्धा मान्य नव्हते असे मी वाचले आहे. साक्षात्काराची स्थिती हळूहळू व्यापक होत जाते असेच त्यांना वाटत असे मी वाचलेले स्मरते.
आपण जे लिहित आहात ते चांगले आहे. पुढे वाचायला उत्सूक आहे.