ही चिमणीच्या घरट्याची कविता मी कधीपासून शोधत होते. सुरुवातीचे कावळेदादाचे कडवे सोडून बाकी सर्व कविता आठवत होती. नीलहंस महाशय तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद.
ही कविता माझ्या इयत्ता पहिलीच्या मराठीच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर होती. पहिली ते चौथीच्या मराठीच्या पुस्तकांमधे लेखक/कवी चे नाव देण्याची प्रथा नाही, त्यामुळे ही बालकवींची कविता आहे हे कधी माहितच नव्हते. अर्थात कवीचे नाव लिहिलेले असते तरी पहिलीत असताना त्याचे महत्व कळलेही नसते कदाचित. असो. ही कविता पूर्ण मिळाल्याचा माझा आनंद अवर्णनीय आहे.