इंटरनेटवरून पाऊसपाण्याचा अंदाज घेऊन कपाशीच्या धूळपेरणीला सुरूवात केली आहे. दुपारी १.०० वाजता पेरणी आटोपली तेव्हा आकाशात सुर्य खेळत होता. पण आता वेळी आभाळ ढगांनी झाकले आहे. विजा आणि मेघांचा गडगङाट सुरू आहे. इंटरनेटवर मिळालेले अंदाज तंतोतंत खरे ठरत आहे. या इंटरनेटच्या नव्या तंत्रज्ञानाला दिल-ए-जानसे सॅल्युट करतो.