>>'सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापकू मुरारी' हे शून्याचं यथार्थ वर्णन आहे
--म्हणुनच मला तुम्ही सांगताय तसा निराकाराचा अनुभव आणि भक्तीमार्गीचा परमोच्च प्रसाद यात काहिच भेद आढळत नाही.
>>आपल्याच नाभितला सुगंध शोधत जन्मभर भटकत राहावं लागतंय, नव्हे आपणच तो सुगंध आहोत!
-- तसही म्हणता येईल.. नव्हे तसे आहेच. त्याचा अनुभव येणं महत्त्वाचं.
>>आत्मसाक्षात्कार एका क्षणात होतो आणि मग तो जन्मभर टिकतो, आगदी मृत्यूतपण साथ देतो हे मात्र मी निःसंदिग्धपणे सांगीन.
--हे प्राणिमात्रांच्या जन्मासारखं आहे. जन्म एका क्षणात होतो, आणि देह भावना आयुष्यभर टिकते... अगदी मरेपर्यंत. पण तो क्षण येण्यासाठी आवश्यक त्या निसर्गचक्रातून जावच लागतं. आपल्याला आलेला अनुभव हे अंतीम सत्य आहे कि नाही हे आपलं आपणच ठरवू शकू.
संजयजी, तुम्ही कुठल्याही शाब्दीक अवडंबरात न अडकता आध्यात्मासारखा सोपा विषय तेव्हढ्याच सोप्या शब्दात सांगत हि
मालिका ज्यापद्धतीने प्रसवताय, मला तर त्याच्या वाचनानेच आनंदीआनंद वाटतोय. मेनी थँक्स, एंड प्लीज कंटिन्यू.