मला वाटतं जिथे अशी स्थिती असते तिथे तो शब्द वापरणं सहज आणि अभिव्यक्तीला पूरक ठरतं, अशा वेळी भाषेचा अभिमान तितकासा भावत नाही.

हे सामान्य माणसाने किंवा एखाद्या दुकानदाराने म्हटले तर ठीक. पण जो लेखक आहे ज्ञानी आहे तो आपले म्हणणे निर्मिती सादर करण्यासाठी योग्य शब्द (हवे तर नवे शब्द करून ते) रूढ करू शकतो. सादरीकरण पकड घेणारे असेल आणि सातत्याने होणार असेल तर त्यातले शब्द कायमचे रूढ होतात. सहज आणि अभिव्यक्तीला पूरक शब्द मिळाले म्हणून वापरले असा पळपुटेपणा करण्याची गरज ताकदवान निर्मात्याला राहत नाही.
असो.