मी प्रतिशब्द विचारला तो केवळ खेळ म्हणून निश्चितच नव्हता.लिहिण्याच्या ओघात डोक्यातली एखादी संकल्पना जशी मनात आली तशी कागदावर उमटत नाहीय असे कित्येकदा होते. माहीत असलेलेच शब्द, पण योग्य वेळी त्या जागी आठवत नाहीत. अश्या वेळी 'मनोगत' सारख्या मराठीप्रेमींच्या,मराठीप्रेमींसाठी असलेल्या संकेतस्थळाची मदत घेतली तर बिघडले कोठे? 'घडवून' सुचविण्यातही गैर काय? ते शब्द वापरण्यास आणि अभिव्यक्तीस सोपे वाटले तर टिकतील, मराठीला समृद्ध करतील, नाही तर आपोआपच नष्ट होतील. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? शब्दांवर, मराठी भाषेवर साधक-बाधक चर्चा व्हावी यासाठीच तर हे स्थळ आहे.

नेत्रदीपक,मनोरंजक,नयनरम्य,फलंदाजी,गोलंदाजी,यष्टिरक्षण,खेळपट्टी, पायचीत,हे शब्द 'घडवून'च तर बनवले. काही नुकसान? या शब्दांमुळे मराठीची 'अवस्था' बिघडली की सुधारली?