१) = 'सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी' हे शून्याचं यथार्थ वर्णन आहे


-- म्हणुनच मला तुम्ही सांगताय तसा निराकाराचा अनुभव आणि भक्तीमार्गीचा परमोच्च प्रसाद यात काहिच भेद आढळत नाही.

= भेद आहे ना म्हणून तर मी पुढची ओळ  (हरी पाहिला गे) लिहिली नाही कारण एकदा हरी आला की मग मोरपिस आलं, गोपी आल्या, राधा, अर्जुन, आख्खं महाभारत आलं. कसं ते पुढे पाहा

२) >आत्मसाक्षात्कार एका क्षणात होतो आणि मग तो जन्मभर टिकतो, आगदी मृत्यूतपण साथ देतो हे मात्र मी निःसंदिग्धपणे सांगीन.

--हे प्राणिमात्रांच्या जन्मासारखं आहे. जन्म एका क्षणात होतो, आणि देह भावना आयुष्यभर टिकते... अगदी मरेपर्यंत. पण तो क्षण येण्यासाठी आवश्यक त्या निसर्गचक्रातून जावच लागतं.

= कोणत्याही चक्रातून जाण्याची काही आवश्यकताच नाही कारण देहभाव (आपण देह आहोत) हा ‘भास’ आहे.

ते असं आहे, वेळ हा भास आहे, तो दूर करायला किती जन्म लागतील? जर आपण वेळेचा भास दूर व्ह्यायला ‘वेळ लागेल’ म्हटलं तर पुन्हा आपण आपल्याच धारणेच्या चकव्यात सापडू! पण सूर्य सदैव प्रकाशमान आहे हे नुसतं स्मरण या क्षणी तो भास दूर करतं. देहभाव ही तसाच आहे. तो भास आहे, आपण देह झालेलो नाही हे एकदा समजलं की प्रश्न संपला!

३) --- आपल्याला आलेला अनुभव हे अंतीम सत्य आहे कि नाही हे आपलं आपणच ठरवू शकू.

= एकदम सही! दुसरं कोण ठरवणार? जर माझीच खात्री नसेल तर मी तुम्हाला काय सांगणार? आणि तुम्हीच जर मानत नसाल तर मी कितीही सांगीतलं तरी त्याचा काय उपयोग?

४) >संजयजी, तुम्ही कुठल्याही शाब्दीक अवडंबरात न अडकता अध्यात्मासारखा सोपा विषय तेव्हढ्याच सोप्या शब्दात सांगत हि मालिका ज्यापद्धतीने प्रसवताय, मला तर त्याच्या वाचनानेच आनंदीआनंद वाटतोय. मेनी थँक्स, अँड प्लीज कंटिन्यू.

= सुरूवात मी करतो पण तुमचे प्रतिसाद मला लिहण्याचा मोह पाडतात!

५) > चर्चेदरम्यान एक कन्सेप्ट विचारायचा राहून गेला... बुद्धांचा नथींगनेस हा ऍब्सोल्युटनेस आहे काय? कि हे सुद्धा दोन वेगवेगळे पैलू आहेत??

= नथिंगनेस म्हणजे खुद्द आपण! या जगात प्रत्येक गोष्ट रेलटिव आहे.

हे जाम मजेशीर आहे, म्हणून थोडं लिहितो:

म्हणजे एव्हरीथिंग इज बीकॉज ऑफ समथींग, आपण स्वत:ला पती मानतो म्हणून कुणी तरी पत्नी आहे, आपण पुत्र किंवा कन्या आहोत म्हणून कुणी तरी माता किंवा पिता आहेत, खरं तर एकदम टोकाला जाऊन, आपण आहोत म्हणून जग आहे, द होल फिनॉमिना इज बिकॉज ऑफ यू.

तुम्ही एकदम फोकस्ड होऊन पाहिलंत तर जोपर्यंत एखादी गोष्ट तुमच्या जाणीवेच्या कक्षेत येत नाही तोपर्यंत ती तुमच्यासाठी व्यर्थ आहे, त्यामुळे  जाणीव ऍबसोल्यूट आहे.

ही जाणीव निराकार आहे, ही जाणीव म्हणजे मेंदू नाही कारण मेंदूची देखील आपल्याला जाणीव होते, ही जाणीव अनेक शब्दानी व्यक्त केली गेलीयं पण शून्य, सत्य, नथिंगनेस, निराकार, व्यापक वगैरे सगळे शब्द आहेत, फक्त एकच गोष्ट नक्की आहे ती म्हणजे आपण!

यू कॅन डाऊट एवरिथिंग बट यू कांट डाऊट योरसेल्फ बिकॉज इव्हन टू डाऊट योरसेल्फ, यू नीड टू बी देअर, सो देअर इज ओन्ली वन थींग दॅट इज ऍबसूल्यूट अँड दॅट इज यू, अँड यू आर नॉट अ थींग!    

संजय