तसाच पझेसिव वापरता वापरता त्याला एखादा एकदम मराठी 'रूप' देईल.

मला भाषेपेक्षा अर्थ महत्त्वाचा वाटतो, संवाद साधणं जास्त अगत्याचं वाटतं.

विश्राम, तुम्ही याला पलायनवाद म्हणाल तर मला ते मंजूर आहे, मला नाही व्यक्त करता येत ती छटा मराठी शब्दातून, पण  मग असं ही वाटतं की भाषा समृद्ध होण्यासाठी आपण शब्दांची दारं उघडी ठेवायला हवीत, किती तरी सुरेख आणि नादमय उर्दू शब्द आहेत जे मराठीत सहज आणता येतील. 

तुम्हाला माहितीये एखादी भाषा लोप पावण्याचं कारणंच ती बोलायला सहज नाही हे आहे मग ती कितीही समृद्ध असो.

तरी ही मी तुमचा मुद्दा नक्की विचारात घेईन आणि माझ्या लेखनात तशी वेळ आली तर एखादे वेळी तसा शब्द सुचूनही जाईल

संजय