>>भेद आहे ना म्हणून तर मी पुढची ओळ (हरी पाहिला गे) लिहिली नाही कारण एकदा हरी आला की मग मोरपिस आलं, गोपी आल्या, राधा, अर्जुन, आख्खं महाभारत आलं.
-- इथे घोडं नडतय. "हरी पाहिला रे" जर "सबाह्य अभ्यंतरी... " पासून तोडून बघितलं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. कॉटेक्स पूर्णपणे बदलतो. राहिला प्रश्न गोपी, अर्जुन आणि राधेचा... तर ज्या अविनाशी प्रेमानंदाचा विचार भक्तीमार्गात येतो, ते प्रेम स्विकारल्याशिवाय या नात्यांची फोड होत नाही. पण मी त्यावर अधीकारवाणीने बोलू शकत नाही. तुम्ही तुमच्या मार्गाने एका कंक्लुजनवर आला आहात. आय एम अ बिगीनर.
>>..... आपण देह झालेलो नाही हे एकदा समजलं की प्रश्न संपला!
बुद्धीला हे समजतय. मनाला कधी कधी समजतं, बहुतेक करून (इथे बहुतेकवेळा लिहीणार होतो... :)) नाही कळत.