आपल्या बायकोने आपण सोडून इतर कोणाशीही बोलू नये असे वाटणे हे नवऱ्याच्या पझेसिव पणाचे एक लक्षण आहे. आता असे वाटणे हा त्यांच्या व आपल्या संस्कृतीमधला फरक आहे असे म्हणणे म्हणजे फक्त पाश्चिमात्य नवऱ्यांनाच असे वाटते, भारतीयांना नाही, असे म्हणण्यासारखे आहे.नवऱ्याच्या स्वभावातल्या ह्या छटेला काय म्हणावे असा मूळ प्रश्न होता. लक्षात ठेवा, इथे त्याने बायकोवर कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाहीय.त्यामुळे बायकोने त्याला काही सांगण्या-विचारण्याचा प्रश्नच येत नाहीय.
असे नवराबायकोचे संभाषण/भांडण लिहायचेच नव्हते, फक्त त्याचा स्वभाव दाखवायचा होता; तर मग आपल्या संस्कृतीला धरून ते कसे लिहावे?