आपल्या बायकोने आपण सोडून इतर कोणाशीही बोलू नये असे वाटणे हे नवऱ्याच्या पझेसिव पणाचे एक लक्षण आहे. आता असे वाटणे हा त्यांच्या व आपल्या  संस्कृतीमधला फरक आहे असे म्हणणे म्हणजे फक्त पाश्चिमात्य नवऱ्यांनाच असे वाटते, भारतीयांना नाही, असे म्हणण्यासारखे आहे.

वरील प्रतिसादातून अगदी सोप्या शब्दात शब्दातून व्यक्त होणाऱ्या दृष्टीकोनातील फरक सांगितला, प्रतिसादाचे शिर्शक देखिल 'शब्दातून दृष्टीकोन व्यक्त होतो' असे म्हटले, तरीही 'पाश्चात्य नवरे पझेसिव व भारतीय नवरे नाही.' असे तुमच्याकडून लिहीले जाणे, हे विसंवादाचे लक्षण दिसत आहे.

आता विसंवादच करायचा म्हटला तर..

एका ठिकाणी तुम्ही 'स्वभावातल्या एका छटेला काय म्हणायचे? ' असे म्हणता. मग लगेचच म्हणता, 'एका व्यक्तीचा स्वभाव दाखवायचाय' असे कां?


एखाद्या व्यक्तीचा स्वभाव काही घटनांच्या सातत्यामधूनच व्यक्त होवू शकतो, केवळ 'एका शब्दात'एखाद्या व्यक्तीचा स्वभाव,  घटनाक्रम न सांगता सांगणे म्हणजे त्याच्यावर थेट आरोप करण्यासारखेच होईल. एकाच गोष्टीमधून भिन्न-भिन्न वाचक वेगवेगळे अर्थ काढतात/ काढू शकतात.

भारतीय संस्कृतीनुसार म्हणायचे झाले तर पझेसिवपणा हे भावनेच्या स्तरावरील असुरक्शिततेमुळे रोजच्या वर्तुणूकीत उतरलेल्या असंतुलितपणाचे लक्षण वाटते.