> आपण देह झालेलो नाही हे एकदा समजलं की प्रश्न संपला!

....बुद्धीला हे समजतय. मनाला कधी कधी समजतं, बहुतेक करून (इथे बहुतेकवेळा लिहीणार होतो... ) नाही कळत.

= बुद्धी, मन, इतका वेळ, तितका वेळ, अखंड, एकसंध, अहोरात्र वगैरे काही इश्यू निर्माण करू नका.

मी तुम्हाला सांगतोयं, तुम्हाला समजलं की झालं!

आणि एकदा समजलं की झालं, मग तुम्ही पुन्हापुन्हा समेवर येऊ शकता. वरच्या प्रतिसादात मी गुरुदेव रानड्यांशी असहमती यासाठीच व्यक्त केलीये. अध्यात्म 'येस किंवा नो' इतकंच आहे, ते कंप्युटरच्या भाषेसारखं क्लिअरकट आहे, त्यात संदिग्धता यत्किंचितही नाही. एकतर तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं.... समजलं तर प्रश्न संपले, नाही समजलं तर पुन्हा वाचा!    

>तुम्ही तुमच्या मार्गाने एका कंक्लुजनवर आला आहात. आय एम अ बिगीनर.

= असं नाही, तुम्हाला समजलं तर तुम्ही वर्तमानात आलात, मी ही वर्तमानात आहे आणि 'कृष्ण' म्हणजे ती निराकार स्थिती देखील सनातन वर्तमानच आहे, आपण एक झालो! 

देअर इज नो बिगीनर अँड नो वेटरन, ऑल आर अलाईक कारण एकरुपता स्थितीशी आहे आणि स्थिती निराकार, सार्वभौम आणि सदैव हजर आहे.

संजय