> अध्यात्म 'येस किंवा नो' इतकंच आहे, ते कंप्युटरच्या भाषेसारखं क्लिअरकट आहे, त्यात संदिग्धता यत्किंचितही नाही. एकतर तुम्हाला समजलं किंवा नाही समजलं.... समजलं तर प्रश्न संपले, नाही समजलं तर पुन्हा वाचा!
आणि सरते शेवटी, नाही समजलं तरी हरकत नाही त्यानी तुमच्या स्वरुपात काहीही फरक पडत नाही! त्यामुळे कशाचीही खंत वाटण्याचं काही कारण नाही.
आज जगाची लोकसंख्या हजार कोटीच्या आसपास असेल त्यात खरी आध्यात्मिक जिज्ञासा असणारे फारफार तर एक-दीड कोटी असतील बाकीचे रोजच्या जगण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे ज्यांना तसा रस नाही त्यांनी इतर गोष्टीत मन रमवावं, संगीत आहे, विनोद आहे, पैसा आहे, चित्रपट-टिवी आहे, पर्यटन आहे, व्यायम आहे, योगा आहे, वैविध्यपूर्ण आहार आहे...त्यांना अधूनमधून अस्वस्थता येईल पण त्यानी फारसा फरक पडत नाही, तुम्ही कशात तरी रमतायं हे महत्त्वाचं. अध्यात्म हा मला आवडलेला विकल्प आहे, सर्वांना त्यात रस असावा असं काही नाही.
संजय