अनेक इंग्रजी शब्द आता मराठीत रुळले आहेत. तरीही त्यांचे मराठीत अनेकवचन करताना आपण काही चुका करतो. इंग्रजीत शब्दाचे अनेकवचन करताना त्याला एस लावला जातो. मात्र मराठीत काही वेळा अनेकवचन हास्यास्पद ठरते. उदा. पँट या शब्दाचे अनेकवचन पँटी असे केले जाते. ते ऐकायला विचित्र वाटते. त्यापेक्षा पँटस असे म्हटले तर चालते. कारण शब्द जर इंग्रजी आहे तर त्याचे अनेकवचन पण इंग्रजीच असणार. आपण पेपर या शब्दाचे अनेकवचन जर "पेपरं" असे केले तर ते "फेफरं" शी साधर्म्य साधेल. त्यामुळे तसे करणे योग्य नाही. तसेच बरेच वेळा काही शब्दांचा उल्लेख आपण फारच मराठीत करतो. उदा. टेबल या शब्दासाठी आपण 'टेबलावर' असे बोलतो. त्यापेक्षा 'टेबलवर' म्हणणे जास्त योग्य ठरते. 'लेबल' साठी 'लेबलावर' म्हणण्यापेक्षा 'लेबलवर' म्हटले तर त्या शब्दाची चिरफाड होत नाही. आणि त्या शब्दाला न्यायही दिला जातो असे मला वाटते.