भयंकर आहे हे सगळं.
पण किती आणि कशी काळजी घ्यायची ? या सोशल नेटवर्कींग साईटस चा वापर न करणे, हा सुद्धा उपाय होऊ शकत नाही . कारण जवळच्या, ओळखीच्या, विश्वासातील लोकांनी सुद्धा अशाप्रकारचा वैयक्तिक आणि खाजगी माहितीचा दुरुपयोग केल्याच्या केसेस बद्दल वाचले आहे.
सुझन च्या बाबतीत एक चांगली गोष्ट घडली , की त्यांना या सगळ्या प्रकाराची कल्पना त्यांना ओळखणाऱ्या लोकांनी दिली ... त्या मुळे त्या या प्रकाराला विरोध करू शकल्या .. जर त्यांना हे कोणी स्पष्टपणे सांगीतलेच नसते , आणि त्यांच्या फोटोचा आणि नावाचा उपयोग त्या स्वताच अशा प्रकारासाठी करत आहेत अशा समजुतीने त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घातला असता तर ? .. लोकं त्यांच्याशी असे का वगतायत? बोलतायत? हे समजून घेण्यात त्यांची शक्ती खर्ची पडली असती आणि तरीही निष्पन्न काहीच झाले नसते ..