'हक्काग्रही' या शब्दातून सद्ध्यातरी 'हक्कांविषयी आग्रही' असा काहीसा अर्थ ध्वनित होतो. उदा आपल्या समाजाविषयी बोलताना आपण म्हणतो की आपण आपल्या हक्कांविषयी नको तेव्हढे आग्रही असतो, कर्तव्याबाबत मात्र नाही.
'हक्क' आणि 'आग्रह' हे दोन शब्द एकत्र करून नवीन सामासिक शब्द बनवला तरी त्याची फोड वरीलप्रमाणेच होण्याची शक्यता आहे. हक्क म्हणजे कोणताही हक्क(राइट) होऊ शकतो, केवळ मालकीहक्क नव्हे.