ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ....
आपल्याकडे एखादा अलौकिक पुरुष होऊन गेला की त्याच्या पश्चात अशा काही कथा रचल्या जातात की सामन्यांना अत्यंत काँप्लेक्स वाटायला लागतो. जर ज्ञानेश्वरांचं वय सांगीतलं जातं त्याप्रमाणे सोळा असेल तर त्या वयात इतकी प्रगल्भता येणं अशक्य वाटतं कारण एकाच वेळी गीतेच्या आकलनासाठी असलेलं संस्कृत वरचं प्रभुत्व, तो अनुभव स्वतःच्या शब्दात मांडण्यासाठी लागणारा आयुष्याचा अनुभव आणि मग तत्कालीन मराठीवर हुकूमत इतक्या कमी वयात शक्य नाही.
याशिवाय गीतेतेतल्या एकेका श्लोकावर अनेकानेक ओव्या रचल्या आहेत उदा. अठराव्या अध्यायातल्या ७८ श्लोकांवर १८१० ओव्या आहेत इतकं काम एखादा सोळा वर्षाचा पुरुष करू शकेल (म्हणजे नुसतं शारीरिक वय नाही तर कालमर्यादेच्या दृष्टीकोनातूनही) हे असंभव वाटतं त्यामुळे त्यांचं वय नक्कीच जास्त असावं असं वाटतं
संजय