निवृत्ती, ज्ञानेश, सोपान हे शिव, विष्णू आणि ब्रह्मदेवाचे अवतार तर मुक्ताई ही चित्कला शक्ती आहे असे नाथपंथ मानतो. (ज्ञानेशो भगवान विष्णुः).
ज्ञानेश्वरीचे प्रचलित मराठीत पुढील अनुवाद उपलब्ध आहेतः अभंग ज्ञानेश्वरी (स्वामी स्वरूपानंद - पावस कृत), सोलापूरच्या मेहेरभक्त श्री. नारायण कुलकर्णी यांचा प्रचलित मराठीतील अनुवादही अत्यंत उपयुक्त आहे.
इथे ईश्वरी अवतार ही संकल्पना (आणि निदान माझ्यासाठी तरी वस्तुस्थिती) नाकारून चर्चा चाललेली आहे. असो.