१. बाकीचे ज्ञानेश्वर हे नेमके कोण कोण होते?
२. त्यातले किती जण योगी आणि किती जण भक्त होते? (अशी वर्गवारी करणे सयुक्तिक आहे हे गृहीत धरून. )
३. बाकीच्या ज्ञानेश्वरांचे फोटो वगैरे उपलब्ध आहेत का?
४. संजीवन समाधी घेणारे ज्ञानदेव हे यापैकी नेमके कोण? ज्ञानेश्वर या नावाने जे काही लिखाण झाले त्यात या सद्गृहस्थांचे नेमके योगदान किती?
५. निवृत्ती, सोपान आणि मुक्ताबाई या काल्पनिक व्यक्तिरेखा आहेत का? त्यांचे लिखाण, चरित्र आणि वय याची बुद्धिवादी संगती लागते का?
६. स्वामी समर्थ, शंकर महाराज,  प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांच्यासारख्या सत्पुरूषांच्या  अलौकिक सामर्थ्याचे बुद्धीवादी स्पष्टीकरणा देता येईल का?