वरील बऱ्याच चर्चा वाचल्या. मला असे वाटते की संजोपरावांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक इंग्रजी शब्दांचे मराठीकरण हास्यास्पद ठरू शकते. काही इंग्रजी शब्द जे मराठीत पूर्वापार रुळले आहेत. ते परके वाटतच नाहीत. पण आता हे मराठीकरण मर्यादा ओलांडत आहे असे वाटते. मागे छगन भुजबळ शिवसेनेत असताना जेव्हा 'बॉम्बे' चे 'मुंबई' केले गेले तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितले होते की " प्रत्येक गोष्टीला स्वतःचे असे एक महत्त्व असते. माझे नांव " भुजबळ" आहे. ते इंग्रजीतही "भुजबळ"च आहे. "आर्मस्ट्राँग" होत नाही." त्या प्रमाणे जे भाषांतरित शब्द मराठी भाषा बोजड करतील ते काय कामाचे? 'की बोर्ड' हा शब्द तसाच वापरणे योग्य ठरेल. विनाकारण त्याचा "कळपट" करून त्याला 'कळकटपणा'  आणण्यात अर्थ नाही.