मला ही असंच वाटतं, भाषा जेवढी सोपी आणि मुख्यतः नादमय, खटकेबाज आणि निव्वळ शब्दानी अर्थ व्यक्त करणारी होईल तेवढी जास्त प्रभावी आणि टिकाऊ होईल, उगीच ओढूनताणून प्रतिशब्द तयार करणं एकतर जिकीरीचं आहे आणि रुळणार पण नाही.

मनोगतवर देखील शिर्षका बद्दलचा आग्रह अनेक वेळा लेखाची आकर्षकता कमी करतो, मध्ये मुन्नी बदनाम हुई वरची पोस्ट त्यामुळेच लेखकानी मागे घेतली याची आठवण झाली

मला देखील 'सिनेमा, सिनेमात सिनेमा (पिक्चर इन पिक्चर - पिआयपि) आणि आपण' असा एक सुरेख लेख लिहायचाये पण प्रशासकांनी शिर्षक बदललं तर त्याची मजाच निघून जाईल म्हणून थांबलोय.

संजय