ममैवमध्ये षष्ठी विभक्तीमुळे मालकीहक्क सुस्थापित होतो.आत्मैवमध्ये तो तसा होत नाही. 'मीच फक्त' आणि 'माझेच फक्त' या दोन अर्थांमध्ये 'माझेच फक्त' हा अर्थ पझेसिव च्या जवळचा वाटतो. शिवाय (सुरुवातीला) वैचारिक लिखाणामध्ये 'ममैवभाव' हा शब्द शोभूनही दिसेल.ललित लिखाणात तसे व्हायला वेळ लागेल.

ता.क. ममैवभाव मध्ये एका बाजूने थोडी 'माझे माझे करण्याची वृत्ती' म्हणजे हाव, ग्रीड दिसून येते, तर दुसऱ्या बाजूने 'हे विश्वची माझे घर'अशी आध्यात्मिक आत्मीयता; असे वाटते. पण अगदी समर्पक, चपखल शब्द मिळणे कठिणच आहे. 

धन्यवाद.