म्हणजे एखादा गायक किंवा वादक ध्वनी या संवेदनेप्रती इतका संवेदनाशिल असतो की त्याचे डोळे मिटलेले असतात, त्याला भूक, स्पर्श, गंध यांची काही खबर रहात नाही तो संपूर्णपणे स्वरात बुडून जातो.

एखादी प्रणयाचा ध्यास असलेली व्यक्ती स्पर्शासाठी इतकी व्याकुळ असते की मग बाकीच्या चार संवेदना बॅकग्राउंडला जातात.

रोजच्या जगण्यात सामान्य माणूस दृष्टी आणि श्रवण याच संवेदना प्रामुख्यानं वापरतो म्हणून त्या विशेष तीव्र आहेत पण सर्व संवेदना बॅलन्स करायच्या असतील तर तुम्हाला इतर संवेदनांचे मार्ग खुले करणारे, तुम्हाला आवडतील असे पर्याय शोधून वापराला हवेत.

संजय