देशपांडेसाहेब,

वाट बघती सर्व ज्याची तोच तो मधुमास तू
वृद्ध अन प्रेमी जनांचा, बालकांचा खास तू
हिरवळीने तू धरेला श्रावणा सजवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा

वेदना गडगंज होत्या हास्य मजला पारखे
सूर विरहाचेच होते छेडले मी सारखे
मेघमल्हारात जगणे शारदे शिकवून जा
ये भिजव माझ्या मनाला पावसा बरसून जा                 .....सुंदर रचना,' से मिसरी गझल ' प्रकाराबद्दल कृपया थोडी माहिती द्यावीत.