लेख छान. आवडला. आमच्या घरी उडदाचे आणि बटाट्याचे पापड होत. नागलीचे आणि पोह्याचे बाहेरून विकत आणत. बटाट्याचा कीस, बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याच्या पापड्या, लोणची वगैरे घरी होत. तेव्हाच्या आठवणी रम्य खऱ्याच. लेख वाचून स्मरणरंजन झालेच शिवाय एकदा बटाट्याचे वेफर्स आणि कीस थोड्या प्रमाणात करूनही पाहावा असे मनांत आले. मात्र आम्ही राहातो तिथे ऊन फार नसते. सहसा ढगाळच असते. त्यामुळे वाळवण कितपत वाळेल आणि वाळायला किती वेळ घेईल ते पाहायला हवे.