गतकाळाची रम्य सफर घडवून आणलीस रोहिणी. प्रत्येक प्रदेशाची खास अशी  वाळवणं असतात . बटाट्याचा कीस, बटाट्याचे उपासाचे पापड, साबुदाण्याच्या पापड्या, कुरडया हे उपासाचे वाळवण, गव्हाच्या कुरडया, बाजरीच्या खारोड्या, उडदा - मुगाचे पापड, ज्वारीची पापड  अशी बीनउपासाची वाळवणं. ज्वारी ओलवून ज्वारीच्या लाह्या फोडून आणणे. अश्या सगळ्या कामात आईला मदत करायचो. हे सगळेच अर्धवट वाळलेले पदार्थ छानच लागतात. लेख मनापसून आवडला.