नमस्कार,
आपल्या लिखाणाचा नियमित वाचक आहे. आजवर प्रतिक्रिया देण्याचा योग आला नाही. आज थोडा फरक जाणवला तो आपणांस सांगावासा वाटला. आपण म्हणता...
ही स्पेस किंवा शून्य अंतिम आहे कारण आकारांचं प्रकटीकरण, अस्तित्व आणि विघटन यानी ती अनाबाधित राहते.
मला वाटते स्पेस किंवा शून्य अंतिम नाही.
"दृष्य गगन दृष्टा आपण त्या गगनाहूनही सूक्ष्म आपण जाणीवरूपे" किंवा "सत्चिदानंदरूपोहंम शिवोहं शिवोहं"
यामध्ये अपेक्षित असलेले आपले स्वरुप हे अंतिम सत्य आहे. कारण त्या शून्याला जाणणारा अंतिम असावा. आपण म्हणता
ही स्पेस अनाबाधित राहते म्हणून ती अंतिम आहे.
मला वाटते ज्या स्पेसमध्ये आकार जेथून प्रकट होतात आणि विलयास जातात ते अंतिम सत्य असावे.
सत्य शोधणं म्हणजे प्रथम या स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणं आणि मग ती स्पेस किंवा तो निराकार हेच आपलं देखील मूळ स्वरूप आहे हे जाणणं आहे.
आपलं मूळ स्वरूप हे निराकार. निर्गुण आहे. जेथून सर्व आकार आणि गुण उदयास येतात ते निराकार आणि निर्गुण असा अर्थबोध घेतला तर एक कळेल की स्पेस मध्ये काही काळ आकार प्रकट होतात, राहतात, दिसतात; पण ते शून्यातून प्रकट होतात का? आणि त्या शून्याला जाणणार काही वेगळा आहे का?
आपलं स्वरूप केवळ शून्य नाही तर सत्चिदानंद आहे. त्या शून्यालाही जाणणारं आहे.