सत्य शोधणं म्हणजे प्रथम या स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणं आणि मग ती स्पेस किंवा तो निराकार हेच आपलं देखील मूळ स्वरूप आहे हे जाणणं आहे.
नमस्कार,
आपल्या वरील विधानात आपण म्हणता की "सत्य शोधणं म्हणजे प्रथम या स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणं आणि पुढे म्हणता की "ती स्पेस किंवा तो निराकार हेच आपलं देखील मूळ स्वरूप आहे" हे जाणणं आहे.
येथे एक प्रश्न उभा राहतो की दखल घेणं किंवा जाणणं म्हणजे एकच प्रक्रिया आहे का? जर स्पेस, व्हॉईड, निराकार किंवा शून्याची दखल घेणारा कुणीतरी वेगळा आहे; म्हणजे त्याचे मूळ स्वरूप हे स्पेस , व्हॉईड यापेक्षा वेगळे असावे.
आपल्या रोजच्या जीवनातील अनुभव सांगतो. आपण गाढ निद्रेत असतो तेव्हा काहीच नसते. पण आपण सकाळी उठल्यानंतर म्हणतो, काय गाढ झोप लागली होती. मग या गाढ निद्रेत, काहीच नसण्याच्या (शून्य, स्पेस, व्हॉईड ची) अनुभवाची दखल घेणारा आणि मग ती शब्दबध्ध करणारा कोण?
आपले मूळ स्वरूप हे केवळ स्पेस, व्हॉईड किंवा केवळ शुन्य नाही, तर सत् , चित् आणि आनंद आहे. सत् म्हणजे केवळ असणे आणि याचे भान चित् म्हणजे जाणीव घेते तेथेच आनंद असावा. आनंद म्हणजे इच्छाविरहित अवस्था किंवा केवळ असणे असा अर्थ मी घेतो.
आपलं स्वरूप म्हणजे सत्चिदानंद रूपोहं शिवोहं शिवोहं हे च असावे; केवळ स्पेस, शून्य नाही.