तुम्ही कसंही करू शकता
सत्चिदानंद रूपोहं
'सत' म्हणजे जे आहे ते (ही निराकार स्थिती), चित म्हणजे सतचा बोध आणि आनंद म्हणजे सत आणि चित यांची संलग्नता
शिवोहं शिवोहं : हे समजलेल्यानी स्वतःला दिलेलं संबोधन आहे
मी जेव्हा आपलं मूळ स्वरूप हे स्पेस, व्हॉईड किंवा शून्य आहे असं म्हणतो त्याचच दुसरं नांव 'सत' आहे (हा सत्य या शब्दाचा अपभ्रंश किंवा त्याचीच एक छटा आहे) पण अर्थ तोच आहे.
निराकार या सोप्या शब्दानी मी तुमच्या जाणिवेचा रोख फॉर्मकडून फॉर्मलेसकडे आणण्याचा (किंवा स्वतःकडे आणण्याचा) प्रयत्न करतो. एकदा का तुम्हाला आपण निराकार आहोत हा बोध झाला (चित) की मग आनंद ही त्याची निष्पत्ती आहे, तो एक लाईट मूड आहे.
या लाईट मूडमध्ये मी स्वतःला शिवं म्हटलं काय, संजय म्हटलं काय किंवा चेहेऱ्यावर नुसतं स्मितहास्य उमटलं काय सगळं सारखंच आहे कारण मग काम झालं!
मी अध्यात्म सोपं करतोयं, सत, चित, आनंद, शिव हे फार अवघड शब्द आहेत त्या ऐवजी मी आता, जाणिव, निराकार आणि लाईट मूड हे शब्द वापरतोयं.
निसर्गदत्त महाराज सिद्धाचं किती सोपं वर्णन करतात पाहा :
तुम्हाला सत्य कळलं याचा पुरावा काय ? तर निश्चिंतता, आनंदाची जाणिव आणि उत्साह!
याला मी एक्सप्रेशन म्हणतो! कारण साधे शब्द, खरा अनुभव आणि तो दुसऱ्यापर्यंत सहज आणि थेट पोहोचावा ही आशा!
तुम्हाला एकदा अनुभव आला की शब्द व्यर्थ होतो किंवा मग तो सहज आणि सोपा होतो.
संजय