गिरीश, महेश, आपले मराठीच्या शुद्धीकरणाचे काम चांगले आहे,
प्रशंसनीय आहे.
पण कित्येक वैज्ञानिक शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द यापूर्वीच
सूचविण्यात आल्याचे अनेकांना माहित नसते.
अशा शब्दांना 'माध्यमांनी' उचित प्रसिद्धी द्यावी अशी माझी अपेक्षा आहे.
प्रशासक महोदयांना मी इथे विनंती करीत आहे, की अशा शब्दांकरीता
एक कायमस्वरूपी शब्दकोष इथे उघडून द्यावा.
त्यात सुरुवातीची भर करण्यासाठी मी सूचविलेले काही शब्द खाली देत आहे. त्यावर सांगोपांग चर्चा होऊन स्वीकारले गेल्यास
सामान्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत ही विनंती.
इलेक्ट्रॉन = वीजक, ऋणाणू
इलेक्ट्रॉनिक्स = वीजकविद्या
प्रोटॉन = धणाणू
न्युट्रॉन = विरक्ताणू
माऊस = मूषक
की-बोर्ड = कुंजीपट
कॉम्पुटर स्क्रीन = संगणक पडदा
स्कॅनर = प्रतिमा संवेदक
प्रिंटर = मुद्रक
यावरून असे लक्षात येईल की 'इलेक्ट्रॉनांची संख्या' पेक्षा 'वीजकसंख्या' म्हणणं जास्त योग्य आणि सोप आहे.
नाही का?