काचेवर पावसाचे थेंब असलेला फोटो सगळ्यात जास्त आवडला. गच्च भरलेलं आभाळही अगदी नीटच पोचतंय त्या फोटोतून. एकुणात इतरही सर्व फोटोज छान.

मुळात पावसात रायगड हे समीकरणच जबरदस्त आहे. ब. मो. पुरंदर्यांच्या शब्दात उडत्या पाखरांच्या पंखांवरही शेवाळं उगवावं असा इथला पाऊस!

पावसाळ्यात गेले नाही कधी. ते वातावरण अनुभवण्यासाठी जमवायला हवा एकदा बेत.