हा शब्द जर स्वामी+आग्रही असा असेल तर त्याची फोड स्वामीविषयी आग्रही अशी होऊ शकेल आणि त्याचा अर्थ आपला स्वामी(पक्षी: मालक,धनी,प्रभू) कोण किंवा कसा असावा याविषयी ठाम मते बाळगणारा/री असा होऊ शकेल. एखाद्या वस्तू/व्यक्तीवर आपलेच स्वामित्व असावे असा हेतू बाळगणारा/री हा अर्थ, जो पझेसिव मध्ये अभिप्रेत आहे तो यातून निघत नाही असे वाटते. धन्यवाद.