कळस, प्रश्नाचा अचूक अर्थ घेतला की वाचक मला अहंकारी ठरवतात! कारण त्यांना आडून आडून प्रश्न विचारायचा असतो. माझं लेखन त्यांच्या धारणा चुकीच्या ठरवतं हे त्याचं खरं कारण आहे. पण तुम्ही म्हणता तशी 'द मोस्ट प्रायव्हेट क्वेश्चन्स आर इन फॅक्ट द मोस्ट पब्लिक क्वेश्चन्स' ही वस्तुस्थिती आहे.
संजयजींचे लेख वाचताना / वाचून कधीतरी आपल्याला निराकाराचा बोध नक्की "क्लिक" होईल, येस! तुम्ही फक्त ओपनली वाचा, सहज, पूर्वधारणामध्ये न आणता आपण एखादी नवी संकल्पना वाचतो तसं वाचा, त्यात काही अवघड नाही. आपण सत्य आहोतच फक्त आपण ते मान्य करत नाहीये इतकाच प्रश्न आहे.
संजय