स्वाम्य=स्वामित्व=मालकी. त्यामुळे स्वाम्याग्रहामध्ये मालकी हक्काबद्दल आग्रह हा अर्थ येऊ शकेल. फारतर स्वामित्वाग्रही म्हणावे. पण हे शब्द फारच संस्कृताळलेले वाटतात. रोजच्या व्यवहारात सोपा शब्द हवा. त्या दृष्टीने हक्कदाखवू किंवा ०गाजवू चांगले. भाववाचक नामे हक्कदाखवेगिरी, हक्कदाखवूवृत्ती किंवा मालकबाजी. एका इंग्रजी शब्दासाठी एकच मराठी शब्द आणि तोही तसेच व्याकरणिक स्थान असणारा सापडलाच पाहिजे हा आग्रह सोडला, की हवे तेवढे पर्यायी शब्द मिळतील.