मला वाटतं,
काम छोटं की मोठं ह्यापेक्षा काम "चांगलं की वाईट" हेच बघावं.
(मान्य आहे की चांगलं/वाईट हे व्यक्ती/प्रसंगसापेक्ष असतं) पण तरीही, वर्गीकरण हे "चांगलं आणि वाईट "असं करावं लागेल.
नाही का? समाजमान्य चौकटीत राहून (सर्वंकष दृष्टीने) पाहिल्यास, हे लक्षात येईल. म्हणजे असं की, एखादा खून हा चांगला म्हटला जाऊ शकतो किंवा वाईटही गणला जाऊ शकतो. हे व्यक्तिसापेक्ष किंवा प्रसंगसापेक्ष झालं, पण कायद्याच्या चौकटीत राहून विचार केल्यास तो गुन्हाच, म्हणजे "वाईट" च ठरेल, नाही का?
तसंच, जर समजा एखाद्या परीक्षेमध्ये पर्यवेक्षकाने एखाद्या विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडून त्याचा पेपर कढून घेतला, तर त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने ते वाईट ठरेलही, पण परीक्षेच्या नियमाच्या चौकटीतून विचार केल्यास ते योग्य म्हणजे "चांगलं" च काम होईल.

माझ्या मते कुठलंही चांगलं काम हे छोटं नसतं. मग करणाऱ्यालादेखील छोटा मानून चालणार नाही. (त्या कामापुरता तरी का होईना )तो त्या कामाइतकाच मोठा गणला गेला पाहिजे.(छोटं ह्याचा मी "हलकं" असा अर्थ घेतलाय... मला वाटतंय तो तसाच अपेक्षित आहे, ह्या चर्चेसाठी)

आता, ह्या चर्चेच्या विषयी जे मला लगेच सुचलं तेच मी लिहिलेले आहे.
                                                                                                                                                                          कृष्णकुमार द. जोशी