शारीरिक श्रमांना कमी किंवा हलक्या दर्जाचे काम मानण्याची समजूत आपल्या समाजात पक्की मुरलेली आहे. शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा नाही म्हणून श्रम करणाऱ्यालाही प्रतिष्ठा नाही. (किंवा उलटे म्हणा हवे तर.) या मनोवृत्तीचे मूळ आपल्या हाडीमासी मुरलेल्या जातिसंस्थेत असावे काय?