मिसअंडरस्टँडींग फॉर वीच द ह्युमॅनिटी हॅज सफर्ड फॉर वेरी लाँग!

एक गोष्ट एकदम पक्की करून टाका, ‘काळ’ असं अस्तित्वात काही नाही, तो भास आहे; देअर इज नथिंग लाईक टाईम, जे काही आहे ते आता, इथे या क्षणी आहे आणि ते नेहमी तसंच आहे.

विचार करायला, काम करायला, आठवायला किंवा काहीही करायला फक्त हाच क्षण आहे.

हा क्षण आणि आपण या एकाच वस्तुस्थितीच्या दोन बाजू आहेत.

वर्तमानात राहा म्हणजे स्वत:शी संलग्न राहा, विचारांना (मग ते मागचे असोत की पुढचे) टेकओव्हर करू देऊ नका कारण विचारांनी तुम्हाला टेकओव्हर केल्यावर विचार प्रार्थमिक होऊन आपण दुय्यम होतो. ‘वर्तमानात राहा’ या तत्त्वाचा अर्थ असा आहे.

जवळजवळ सर्व आध्यात्मिक गुरूंनी तुमचा वर्षानुवर्षे केलेला संभ्रम मी इथे दूर करतो:

मेमेरी आणि इमॅजिनेशन या ब्रेन फॅकल्टीज म्हणून वापरणं वेगळं आणि त्यांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ असा विचार करून स्वत:चं आयुष्य दुर्धर करणं वेगळं!

आय थिंक आय हॅव मेड द मोस्ट प्रोफाऊंड स्टेटमेंट! यामुळे तुमचे कालाविषयीचे सर्व गैरसमज दूर होतील
_______________________________________

आता तुमचा प्रश्न

>सर्वच जण वर्तमानकाळात जगा असे सांगतात. ते पटतेही. पण आज आपण जे काही आहोत ते भूतकाळात केलेल्या प्लॅनिंगमुळेच आहोत.

= ‘आता’ जागृत झालेल्या स्मृतीमुळे मागचं आठवतंय पण जे काय आठवतंय ते आता आहे

>भविष्यकाळाचे प्लॅनिंग करताना, भूतकाळातील अनुभव कामी येतो. त्यामुळे भूतकाळाची उजळणी (आठवण) करावीच लागते. आणि त्या आठवणींबरोबर मन पुन्हा पुन्हा भूतकाळात रमते आणि त्याच्या संदर्भाने भविष्यातल्या योजना आखते. ही सतत चालणारी घटना आहे, व मन सतत यात गुंतलेलं असतं

= आपली स्मृती माहिती साठवते ती वर्तमानात वापरून आपण आता समोर असलेला विषय डिल करू शकतो पण स्मृती आणि प्रसंग यांचा मेळ वर्तमानातच घातला जात असतो.

> मी जेव्हा प्लॅनिंग म्हणतो, तेव्हा त्यात विशेषतः शॉर्ट टर्म बद्दल मला अभिप्रेत आहे. ऊदा. मला ४ दिवसांनी एक प्रेझेंटेशन करायचे आहे. त्याचे मला प्लॅनिंग करावे लागेल. त्यासाठी पूर्वीचा अनुभव आठवून, त्यानुसार तयारी करावी लागेल व भविष्यातील प्रेझेंटेशनचे चित्र रंगवावे लागेल. हे चित्र रेखाटल्याशिवाय मला त्यासाठी लागणारी तयारी सर्वार्थाने करता येणार नाही.

= स्मृतीचं रिट्रायवल, भविष्याचं इमॅजिनेशन आणि आता चालू असलेली कृती सर्व वर्तमानातच घडतंय याचा सतत बोध असला की संपूर्ण प्रोसेसवर आपलं नियंत्रण राहतं. यू आर नायदर टेकन अवे बाय द पास्ट फेल्युअर (इफ एनी) नॉर बॉदर्ड अबाऊट द इव्हेंट वीच इज यट टू टेक प्लेस.

 >असे प्लॅनिंग अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठीही सतत लागते व त्यामुळेच मनाचे सदैव भूत भविष्यात जाणे चालूच राहते, जे की जीवन जगतांना आवश्यक आहे, असे वाटते.

= वन कॅन रन अ मॉक ट्रायल ऑफ एनीथिंग अँड रिहर्स ऍज मच ऍज वन वाँटस सो लाँग ही नोज दॅट इट इज नॉट द इव्हेंट इटसेल्फ!

तुम्ही नीट पाहा जेव्हा आपण भयभीत होतो तेव्हा भविष्यकालीन प्रसंग आपल्याला वर्तमानात ‘सार्थ’ वाटलेला असतो, आपल्या कल्पनेनी आपल्याला टेकओव्हर केलेलं असतं किंवा

जेव्हा आपण गतस्मृतींनी दु:खी झालेलो असतो तेव्हा आपल्याला वर्तमानात त्या स्मृतीनी ओव्हरपॉवर केलेलं असतं

आणि वास्तविकात, आपल्या समोर, आता, तो पूर्वी घडलेला प्रसंगही नसतो आणि भविष्यात घडेलशी वाटणारी घटनाही नसते!

या मनाच्या अनिर्बंध सक्रियतेला मी ‘सिनेमातला सिनेमा’ म्हटलंय!

संजय